ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला, कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ठाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2020 08:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला, कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ठाम

शहर : देश

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटळला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बातचितचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, केंद्र सरकारच्या प्रस्तावात कोणत्याच गोष्टी स्पष्टपणे नमूद नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावावर चर्चा केली. या चर्चेत एकमताने हा प्रस्ताव फेटाळण्यात आलं. त्यानंतर शेतकरी संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली

“ज्याप्रकारे केंद्र सरकार बातचितची प्रक्रिया पुढे नेत आहे त्यावरुन स्पष्ट होतंय की, केंद्र सरकार या विषयाला रेटत नेवून शेतकऱ्यांचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आमच्या मुद्द्यांना हलक्यात घेत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे नेते युधवीर सिंह यांनी दिली.

भारत सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आलं आहे. शेतकऱ्यांनी नेहमी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे, असं स्वाराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितलं (Farmers reject Modi government proposal).

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

 

 

 

मागे

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री
कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

युनायटेड किंगडम अर्थात UKमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अ....

अधिक वाचा

पुढे  

विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!
विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!

कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण देशात खबरदारीच्या उपाययोजना के....

Read more