ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीतील फिल्मिस्थानमध्ये भीषण आग, ३५ जणांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 08, 2019 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीतील फिल्मिस्थानमध्ये भीषण आग, ३५ जणांचा मृत्यू

शहर : delhi

जून्या दिल्लीतील भाजी बाजारात भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर मृतांची संख्या ४० पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे ५० जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. जून्या दिल्लीतील राणी झांसी रोडवर असलेला फिल्मस्तान सिनेमागृहाबाहेर आग लागली.

पहाटे पाच वाजता आग लागल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत होते. घटनास्थळी ३० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झालेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावर आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आहे. 

याठिकाणी दोन प्लॉस्टीकचे कारखाणे असल्याचं समोर येत आहे. रस्ता अरूंद असल्यामुळे आडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रविवार असल्यामुळे वाहतूक कोंडी नाही. पण बघ्यांनी मात्र भरपूर गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

मागे

बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित
बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापिरनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपा....

अधिक वाचा

पुढे  

तामिळनाडुतील मदुराईत कांदा २०० रूपये किलो
तामिळनाडुतील मदुराईत कांदा २०० रूपये किलो

तामिळनाडूतील मदुराईत कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. एनएनआयने हे वृ....

Read more