ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देगलूर येथे भीषण अपघातात 5 जण ठार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देगलूर येथे भीषण अपघातात 5 जण ठार

शहर : nanded-Waghala

देगलूरमध्ये  आज सकाळी भीषण अपघात झाला. मुलाच्या लग्नासाठी हैदराबादला जात असताना शंकरमपेठ येथे क्रुझर आणि ट्रकमध्ये समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. देगलूर येथील लाईन गल्लीत राहणार्‍या सरसंबे परिवारातील तीन जण या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.  सरसंबे परिवारातील शिवानी बंडप्पा सरसंबे (वय 18), गुंडप्पा शिवलिंग सरसंबे (48), रजनी गुंडप्पा सरसंबे (42) सर्व राहणार देगलूर, अशी मृतांची नावे आहेत. क्रुझर चालक व अन्य एक अशा एकूण पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. सरसंबे परिवारातील मुलाचे उद्या हैदराबादमध्ये विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी परिवारातील काही सदस्य व नातलग लग्नाच्या पूर्वतयारीसाठी सकाळच्या सुमारास देगलूर येथून क्रुझरने हैदराबादकडे जात होते. याचवेळी देगलूरपासून जवळपास 80 ते 90 किलोमीटर अंतरावरील शंकरपेठ येथे समोरून येणार्‍या ट्रकला क्रुझरची समोरा-समोर जोराची धडक झाली. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सरसंडे परिवारावर शोककळा पसरली आहे.

मागे

महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम
महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम

मुंबईसह महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, अजून तीन दिव....

अधिक वाचा

पुढे  

औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ झाली चार बछड्यांची आई
औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ झाली चार बछड्यांची आई

औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात ‘समृद्धी’ या वाघिणींने चार बछड्यांना ....

Read more