ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं निधन

शहर : देश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते.

21 मार्च 1934 मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटा सिंग हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

मागे

धक्कादायक ! गॅस गिझरने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? रहा सावध
धक्कादायक ! गॅस गिझरने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? रहा सावध

गॅस गिझर (gas geyser) फुटल्याने एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घट....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, ‘या’ पाच ठिकाणी लसीचे स्टोरेज
कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, ‘या’ पाच ठिकाणी लसीचे स्टोरेज

कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोका....

Read more