ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात; यूनिसेफचा धक्कादायक अहवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात; यूनिसेफचा धक्कादायक अहवाल

शहर : देश

2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात असल्याचा इशारा यूनिसेफनं दिला आहे. 2020 प्रमाणेच पुढल्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास याचा गंभीर परिणाम एका पिढीला भोगावे लागतील असा अहवाल यूनिसेफनं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या या संघटनेचं म्हणणं आहे की, कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. कारण जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

140 देशांमध्ये करण्यात आला सर्वे

140 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भात माहिती समोर आली आहे. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी आणि असमानतेचा समावेश करण्यात आला आहे.

20 लाख मुलांवर मृत्यूचं सावट

यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही तर जवळपास 20 लाख मुलांचा पुढिल 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफनं व्यक्त केलं आहे.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती; भारतातील अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान सरकारनेही खबरदारीचे घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानातील 8 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह मास्क न घातल्याबद्दल दंड वाढवून 500 रुपये केला आहे. तर राजधानी जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता, नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच गुजरात सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मागे

कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू
कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक राज्यांनी आता ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आह....

Read more