ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडहिंग्लजमध्ये भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा चेंदामेंदा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडहिंग्लजमध्ये भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा चेंदामेंदा

शहर : कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच चेंदामेंदा झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आढळले.रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारला मागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडलाय. यामध्ये कारमधील तीन विद्यार्थी जागीच ठार झाले. हरळी बुद्रुक जवळील इंचनाळ भागात हा अपघात घडला. सुरज ब्रह्मा पाटील (रा. बेळगाव), सुरज जयवंत टिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि विश्वजीत पांडुरंग पाटील ( रा. गोकुळ शिरगाव) या तीन विद्यार्थ्यांची नावं आहेत.तर या अपघाता दरम्यान या गाडीत असणारे संदेश सदाशिव टिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि अजिनाथ साहेबराव खुडे (रा. वडगा) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलंय.

मागे

स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरून घसरले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरून घसरले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

शिर्डीमध्ये स्पाइस जेटचे विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्यामुळे प्रव....

अधिक वाचा

पुढे  

आमच्या देशात दहशतवादी आहेत; पाकिस्तानची कबुली
आमच्या देशात दहशतवादी आहेत; पाकिस्तानची कबुली

दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ पाहता अखेर पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून ....

Read more