ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट राज्यात 19 जण बुडाले

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट राज्यात 19 जण बुडाले

शहर : मुंबई

राज्याच्या विविध भागात काल गुरुवारी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात काढण्यात आला. मुंबई-पुणे-आदि प्रमुख शहरांमध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय सिसिटीव्ही कॅमेरे आणि द्रोणच्या सहाय्याने करडी नजर ठेवण्यात आली होती. बाप्पाला 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर असंख्य भाविकानी ठिकठिकाणी समुद्र, नद्यावर भावपूर्ण निरोप दिला. तथापी, या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले. अमरावतीमध्ये 4, राजापूर 3, तारकली, नगर, नागपूर मध्ये प्रत्येकी दोन, तर ठाणे, नांदेड, कराड, भंडारा आणि वर्धा येथे प्रत्येकी 1-1 ठाणे शहरात बुडाल्याचे वृत आहे.

अमरावती मधील पूर्णा नदीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या 3 तरुणाचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सतीश सोळंके, ऋषिकेश वानखेडे, सतीश वानखेडे, सागर शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावे आहेत.

रत्नागिरीतील राजापूरमधील धोपेश्वर येथे सिद्धेश तेरवनकर हा तरुण बुडाला तर पडावे येथेही गणपती विसर्जनासाठी गेलेले कुलदीप वारंग आणि ऋतिक भोसले हे दोघे तरुण बुडाले. तारकली-आचारा येथे विसर्जनासाठी गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब हे दोघे गणपती विसर्जनकरून माघारी येत असताना लाटेच्या तडाख्याने समुद्रात बुडाले.

नागपुरातील हिंगणा परिसरात वेना नदीत गणेश विसर्जनासाठी उतरलेले सुरेश फिरके व त्यांचा पुतण्या अजिंक्य फिरके या दोघांचा बुडून मृत्यू झाला. वाशिम मधील मंगळुरू पीर तालुक्यात मासोळा खुर्द येथील तलावात 17 वर्षाचा युवक बुडाला, तर नांदेड मध्ये हडगाव तालुक्यातील तामसा गावातील शशिकांत कोडगीरवार हा तरुण बुडाला. ठाण्यातील शहापूरमधील कुंदन गावाच्या कातकरी वाडीतील कल्पेश जाधव हा 12 वर्षाचा मुलगा तोल जाऊन पडला आणि बुडाला. कराडच्या आगाशीव नगरातील चेतन शिंदे हा गणेशोत्सव कोयना नदीत वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहामुळे हा मुलगा सापडला नाही. भंडार्‍यातील ढोलसार गावात राहणारा लोकेश शिवणकर शेत शिवारातील नाल्यात वाहून गेला. वर्धा येथील जुनापानी येथे शेतातील विहिरीत गणपतीचे विसर्जन कारणासाठी उतरलेल्या गुणवंत गाखरे हा तरुण बुडाला.

मागे

भारतीय सैन्याचे अधिकारी 6 दिवसांपासून बेपत्ता
भारतीय सैन्याचे अधिकारी 6 दिवसांपासून बेपत्ता

भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले गौरव सोलंकी नावाचे अ....

अधिक वाचा

पुढे  

महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल
महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल

 राज्य शासनाने महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. याम....

Read more