ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी देशाचे 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी देशाचे 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

शहर : देश

महाराष्ट्रासाठी अभिमानाची असा क्षण असून देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे यांची नियुक्ती झाली आहे. मावळते लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याकडून मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. लेफ्टनंट नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत.

बिपिन रावत हे आज निवृत्त झाले असून आता ते देशाचे पहिले सीडीएस झाले आहेत. दरम्यान, नरवणे यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत.

1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडिलही हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे 28वे लष्कर प्रमुख आहेत.

 

मागे

देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला
देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला

देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. देशाच....

अधिक वाचा

पुढे  

कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन
कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन

          पुणे - कोरेगाव-भीमा इथे आज १ जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विज....

Read more