ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

HDFC बँकेला मोठा धक्का,एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान..जाणून घ्या कारण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

HDFC बँकेला मोठा धक्का,एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान..जाणून घ्या कारण

शहर : मुंबई

शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला आहे. खरं  कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरलासेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागलाबँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या एकूण रकमेच्या पाचपट पेक्षा जास्त रक्कम एका झटक्यात नष्ट झाली.

1600 अंकाहून अधिकची घसरण

शेअर बाजार बुधवारी सकाळी 71,988 अंकांवर खुला झाला पण बाजार बंद होताना यात 1628.02 अंकांची घसरण झाली आणि शेअर बाजार 71,500.76 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात निफ्टीमध्ये 460.35 अंकांची घसरण होऊन 21,571.95 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

बँकेचे शेअर्स 1528 रुपयांच्या खालच्या पातळीवर

शेअर बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसलाकंपनीचे समभाग 8 टक्क्यांहून अधिक घसरले. ट्रेडिंगच्या शेवटच्या तासात एचडीएफसी बँक स्टॉकमध्ये (HDFC Bank Stock) मोठी घसरण नोंदवली गेली आणि बीएसईवर 8.57 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह तो 1535 रुपयांच्या निचांकी पातळीवर आला. एचडीएफसीचे शेअर्स दिवसभर रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. बँकेचे शेअर्स सकाळी 9.15 वाजता 1570 रुपयांच्या पातळीवर उघडले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेले. बँकेच्या समभागांच्या घसरणीमुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना (HDFC Bank Investors) 100,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं आहे.

तिन महिन्यातील कमाई गमावली

एचडीएफसी बँकेच्या शेअरमधील ही घसरण आश्चर्यकारक मानली जातेय. कारण टेड्रिंगच्या शेवटच्या दिवशी, कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, जे अतिशय उत्कृष्ट होतेएचडीएफसी बँकेच्या तिसर्या तिमाहीच्या निकालात निव्वळ नफ्यात 34 टक्के वाढ दाखवण्यात आली होती. यानुसार एचडीएफसी बँकेला तीन महिन्यांत 16,372 कोटी रुपयांचा नफा झाला. पण एका दिवसात कंपनीचे बाजार भांडवल (HDFC Bank MCap) 100,000 कोटींनी कमी झाले.

मंगळवारी बाजार बंद असताना HDFC बँकेचे बाजार भांडवल रु. 12,74,740.22 कोटी इतके नोंदवले गेलं होतं, पण बुधवारी ते 11.68 लाख कोटींवर आलं. त्यानुसार पाहिल्यास कंपनीचे मूल्य एका दिवसात 106740.22 कोटी रुपयांनी कमी घटलं.

 

मागे

आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान
आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान

अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात....

अधिक वाचा

पुढे  

घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय, महारेराने जारी केले आदेश
घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय, महारेराने जारी केले आदेश

निर्णय घेण्यात आला आहे. घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी महारेराने ही पाऊल उचल....

Read more