ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली

शहर : नागपूर

नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याची कबुली देतानाच या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे आज आणि उद्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळीटीव्ही 9 मराठीशी खास बातचीत करताना टोपे यांनी ही कबुली दिली. या दौऱ्यात ते आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि भंडाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये RTPCR च्या चाचण्या वाढवण्याची गरज असून या चाचण्या वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

कोरोनाची तीव्र लक्षणे नसलेल्यांना आता रुग्णालयात येण्याची गरज नाही. आता होम क्वॉरंटाइन होण्यावर भर द्यावा लागेल. ज्या ठिकाणी टेस्टिंग कमी झाल्या तिथे प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे त्या ठिकाणी टेस्टिंगवर भर देण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही भर देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारकडून विदर्भाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. विदर्भाकडे सरकारचं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही. विदर्भातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दर आठवड्याला बैठका घेण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. विदर्भातील कोरोना मृत्यूचा दर कमी करणे, आयसीयू बेडची संख्या वाढवणे, ऑक्सिजनची संख्या वाढवणे आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यावर आमचा सर्वाधिक भर असेल, असंही ते म्हणाले.

तर पाचपट दंड आकारणार

दरम्यान, रुग्णांकडून भरमसाठ फी वसूल करणाऱ्या रुग्णालयांनाही टोपे यांनी सज्जड दम भरला आहे. रुग्णांकडून भरमसाठ फी आकारल्यास पाचपट दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी या खासगी रुग्णालयांना भेट देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

मागे

सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड,प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित
सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड,प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित

राज्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात मोठे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल हे बीडच्....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर
कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर

लातूर शहरातील एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड म....

Read more