ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी

शहर : यवतमाळ

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढला असून,  उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे. आर्णी तालुक्यातील कल्पना शिंदे या उपवर मुलीचा उपचरादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. तर येथील वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह बुधवारी आढळून आला.
आर्णी तालुक्यातील जहागीरमधील रघुनाथ शिंदेंची मुलगी कल्पना हिचा विवाह ठरल्याने परंपरेप्रमाणे देवदर्शनासाठी गेले होते. त्या वेळी प्रवासादरम्यान कल्पनाला उलट्या होऊ लागल्याने तुळजापूर येथे उपचार घेऊन तिने कुटुंबीयांसोबत पुढचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान 30 एप्रिलला तिचा मृत्यू झाला. देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुसर्‍या घटनेत वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंगलदीप गावाजवळ 1 मे रोजी सकाळी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविला आहे. उष्माघातानेच या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मागे

जनाची नाही तर मनाची तर लाज असायला हवी; फडणवीसांनी राजीनामा द्यावा- शरद पवार
जनाची नाही तर मनाची तर लाज असायला हवी; फडणवीसांनी राजीनामा द्यावा- शरद पवार

गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी बुधवारी घडवून आणलेल्या भुसु....

अधिक वाचा

पुढे  

वर्षानुवर्षे रखडलेला धारावीचा पुनर्विकास आणखीनच रखडण्याची चिन्हे 
वर्षानुवर्षे रखडलेला धारावीचा पुनर्विकास आणखीनच रखडण्याची चिन्हे 

मुंबईतील धारावी झोपडपट्टील वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास आणखीनच रखडण्....

Read more