ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2019 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा

शहर : मुंबई

येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.कुलाबा वेधशाळेच उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी  यासंदर्भात माहीती दिली आहे. मुंबईत काल रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.. तर या आठव्यात म्हणजे दोन आणि तीन जुलैला मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे.

मुंबई आणि उपनगर तसंच नवी मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याला जणू तळ्याचं स्वरुप आलं आहे. दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या वसाहती आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे.    

 

मागे

प्लॅस्टिक बंदी पुन्हा सुरू
प्लॅस्टिक बंदी पुन्हा सुरू

गेल्या वर्षी सुरू झालेली आणि निवडणूक धामधुमीत गायब झालेली प्लॅस्टिक बंदी म....

अधिक वाचा

पुढे  

जात पडताळणी समितीच्या तीन अधिकार्यांतना निलंबित करण्याचे आदेश
जात पडताळणी समितीच्या तीन अधिकार्यांतना निलंबित करण्याचे आदेश

नगरसेवकांकडे 50 लाख रुपयांची लाच मागणार्‍या जात पडताळणी समितीच्या तीन अधिक....

Read more