ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 10:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

शहर : मुंबई

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा Rain पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. Marathwada मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण konkan या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून, २१ आणि २२ ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहेकुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करतही यासंदर्भातील माहिती दिली.

'IMD GFS नुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ,मराठवाडा,.मध्य महाराष्ट्र, .कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता', असा इशारा देत त्यांनी बळीराजानं पिकाची काळजी घेणे आवशक्य असल्याचं सांगत सर्वांनाच सतर्क केलं. शिवाय येते काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहनही केलं.

बंगालच्या उपसारगात पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी राज्यातील वातावरणावर याचे थेट परिणाम होऊन बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेला हा इशारा पाहता आधीच अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाडा आणि इतर भागातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे.

 

मागे

सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?
सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मेट्रो आणि म....

अधिक वाचा

पुढे  

चीन-पाकला उत्तर देण्यासाठी जोरदार तयारी, अंबाला एयरबेसला लष्करप्रमुखांची भेट
चीन-पाकला उत्तर देण्यासाठी जोरदार तयारी, अंबाला एयरबेसला लष्करप्रमुखांची भेट

पूर्व लडाखमध्ये चर्चा सुरू असूनही चीन माघार घ्यायला तयार नाही. अशा परिस्थि....

Read more