ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

शहर : मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर पेण येथील बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला. मुख्यमंत्री फडणवीस सुखरुप असून ही सामान्य घटना होती, असे जिल्हा पोलीस यंत्रणकडून सांगण्यात आली. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्याचा पीए, एक इंजिनिअर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. हेलिगो चार्टर प्रायव्हेच लिमिटेडचे हे हेलिकॉप्टर असल्याचे माहिती मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेत आहेत. हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली आणि पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र, पायलटचे प्रसंगवधानाने पुन्हा नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अपघात टळला. या अपघातानंतर एकच धावपळ उडाली. मात्र, मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी निवडणुकीची प्रचार घेतली आणि जोरदार भाषण केले. त्यांच्या चेहऱ्यावर अपघाताचे भाव दिसत नव्हते.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पाऊस पडल्याने जमीन ओली झाली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले होते. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत. हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

मागे

टाटाची इलेक्ट्रिक कार लॉन्च
टाटाची इलेक्ट्रिक कार लॉन्च

टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्र....

अधिक वाचा

पुढे  

JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा
JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा

जिओचे फ्री कॉलिंग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर Reliance Jio ने आणखी एक महत्त्वाची ....

Read more