ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रजाकसत्ताक दिनादिवशी देशभरात हायअलर्ट

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रजाकसत्ताक दिनादिवशी देशभरात हायअलर्ट

शहर : मुंबई

       नवी दिल्ली : प्रजाकसत्ताक दिन नुकत्याच दिवसांनी येणार असल्यास या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. २६ जानेवारीला प्रजाकसत्ताक दिन असल्यास वेगवेगळ्या राज्यात या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पहायला मिळते. त्याचबरोबर देशावर दहशतवादी हल्याचे सावट निर्माण झाले आहे.

       आयएसआयच्या तमिळनाडू मॉड्यूलचे ४ फरार दहशतवादी हल्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. या दहशतवाद्यांचे प्रमुख टार्गेट दिल्ली असल्याची संशय वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान या बॉर्डरवर अधिक जवानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच भारत-पाक सीमेवर बीएफएफ जवानांनी 'ऑपरेशन सर्द हवा' सुरू करण्यात आले आहे. 

        गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हिजबुल’ या दहशतवादी संघटनेकडून ट्रेनिंग घेऊन ‘अल बद्र’चे दहशतवादी हिजबुलच्या लॉजिस्टिक सपोर्टचा वापर करुन हल्ला करु शकतात. आणि दुसरीकडे अल बद्र या दहशतवादी संघटनेला पुन्हा सक्रीय करण्यासाठी एक मोठा हल्ला करु शकतो. याची जबाबदारी हिजबुलचे कमांडर रियाज नायकू याला सोपवली आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास ४० दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. जे भारतासाठी धोकादायक ठरु शकतात. 

      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज नायकू हा सध्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने त्याला किडनीचा आजार झाला आहे. याची जबाबदारी त्याचा साथीदार हम्माद याला दिली आहे. हम्माद हा सध्या अलबद्रची रिक्र्युटमेंट आणि ट्रेनिंगचे काम करत आहे.
 

मागे

मुरुड समुद्रकिनार्‍यावर आढळला मृत ब्ल्यु व्हेल मासा
मुरुड समुद्रकिनार्‍यावर आढळला मृत ब्ल्यु व्हेल मासा

        रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुड समुद्....

अधिक वाचा

पुढे  

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती

           मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती स....

Read more