ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 11:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु

शहर : मुंबई

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. काही नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 50 टक्के क्षमता, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर यांसह काही नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार बऱ्याच दिवसांपासून बंद होते. त्यामुळे ते पुन्हा सुरु व्हावे यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी विंनती केली होती. या विनंतीनंतर नियमावली ठरवत अनलॉक-5 अंतर्गत हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सरकारकडून आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. कार्यप्रणालीत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

‘या नियमांचे पालन करणे गरजेचे

सर्व ग्राहकांची थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करणे

सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे

दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अतंर पाळावे

ग्राहकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक

ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक

परिसराचे दिवसातून दोनवेळा सॅनिटायझेशन करणे गरजेचे

कर्मचाऱ्यांनी एन-95 किंवा याच दर्जाचा मास्क वापरणे गरचेचे

करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल

कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगबाबत प्रशिक्षण घ्यावे

जेवणामध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा

हॉटेलमधील सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे

सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोव्हिड चाचणी करणे अत्यावश्यक

वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परिसर कायम स्वच्छता राखावी

ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.

मुंबई पालिकेचे हॉटेल्ससंदर्भातील काही नियम

दरम्यान हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेनेही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांसह ग्राहकांना राज्य सरकारसह मुंबई महापालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.

मुंबईत हॉटेल्समध्ये टेबलाचे प्री-बुकिंग आवश्यक

ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही

दोन टेबलमध्ये कमीत कमी 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक

टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणं बंधनकारक

मागे

सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती
सर्वात अगोदर कोरोना व्हॅक्सीन कुणाला दिली जाणार? आरोग्य मंत्र्यांची माहिती

कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याच काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिस....

अधिक वाचा

पुढे  

घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला
घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

मुंबईच्या घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह ....

Read more