ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेव्हा तुकाराम मुंडे म्हणतात, ‘हे खरं यश आहे!’

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जेव्हा तुकाराम मुंडे म्हणतात, ‘हे खरं यश आहे!’

शहर : मुंबई

गडचिरोली जिल्हा तसा फारच दुर्गम जिल्हा अनेक वर्ष अनेक विकासकामं रखडलेल्या अवस्थेत अनेक वेळा तिथल्या रुग्णांना दवाखान्यात जायचं म्हटलं तर जंगलातून काट्या-कुट्यातून वाट काढत जावे लागते. मात्र आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. याच रुग्णालयाचं आणि ज्यांनी हे रुग्णालय उभारण्यात मोलाची भूमिका बजावली त्या जिल्हाधिकाऱ्यांचं आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कौतुक केलं आहे. ‘हेच खरे यश…’ म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. (IAS Tukaram Mundhe Tweet Over Gadchiroli District Government Hospital)

तुकाराम मुंढे यांचं ट्विट

हे गडचिरोलीचं जिल्हा रुग्णालय आहे यावर विश्वास ठेवा अतिशय प्रेरणादायी आणि ग्रेट वर्क असं ट्विट करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं अभिनंदन करत तुकाराम मुंढे यांनी त्यांची तारीफ केली आहे.