ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

शहर : देश

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी ही रेल्वेचीच असणार आहे. यासंदर्भातील दाखल झालेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय

रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे महिला प्रवाशाला रेल्वेकडून 1 लाख 33 हजारांची मिळाली नुकसान भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश ठेवला कायम ठेवून रल्वेला ही भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आलेयत.न्या. डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

दिल्ली ते सिकंदराबाद प्रवासात एका महिलेच्या चीजवस्तू चोरीला गेल्या. तक्रारदार महिलेला रेल्वे प्रवासादरम्यान सीटखाली सामान बांधून ठेवायचे होते. पण साखळी उपलब्ध नव्हती. तसेच तिकीट नसणारे अनेक प्रवासी डब्यातून प्रवास करत होते. ऑन ड्युटी असलेले रेल्वे पोलीस फुकट्या प्रवाशांना रोखताना दिसत नव्हते. त्यामुळे चोरी झाली, असा दावा या महिलेने केला आणि तो सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरण्यात आला.

भारतीय रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या एका आदेशाविरोधात रेल्वेने ही याचिका दाखल केली होती.प्रवाशाच्या चोरीला गेलेल्या सामानाची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने रेल्वेला दिले होते. आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे

मागे

दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार ?
दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार ?

दहावीचे विद्यार्थी यावर्षी अतिरिक्त गुणांना मुकणार अशी शक्यता आहे. चित्रक....

अधिक वाचा

पुढे  

Corona Vaccination : १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात 'यांना' मिळणार लस
Corona Vaccination : १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात 'यांना' मिळणार लस

सोमवारपासून खासगी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांन लस देण्यात येणार आहे. १ मार्च....

Read more