ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Covid-19 : गेल्या २४ तासांत देशात १ हजार ५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 10:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Covid-19 : गेल्या २४ तासांत देशात १ हजार ५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

शहर : देश

देशात अनेक सक्तीचे  नियम लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं, मास्क वापरणे इत्यादी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७७ हजार २६६ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३३ लाख ८७ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ६१ हजार ५२९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू असून २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

 

मागे

Nagpur Corona : उपचाराअभावी गाडीतचं होतोय मृत्यू, लॉकडाऊनच्या मागणीत वाढ, नागपुरातील भयावह वास्तव
Nagpur Corona : उपचाराअभावी गाडीतचं होतोय मृत्यू, लॉकडाऊनच्या मागणीत वाढ, नागपुरातील भयावह वास्तव

नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह....

अधिक वाचा

पुढे  

सुप्रीम कोर्ट आज 'हा' महत्त्वाचा निर्णय सुनावणार
सुप्रीम कोर्ट आज 'हा' महत्त्वाचा निर्णय सुनावणार

अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आज....

Read more