ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुमचा हिस्सा तर फाळणीच्यावेळीच दिला होता; असुदुद्दीन ओवैसींना भाजपकडून प्रत्युत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुमचा हिस्सा तर फाळणीच्यावेळीच दिला होता; असुदुद्दीन ओवैसींना भाजपकडून प्रत्युत्तर

शहर : मुंबई

भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू म्हणून राहत नाहीत. त्यांचा या देशात बरोबरीचा हिस्सा आहे, असे वक्तव्य करणारे एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांना भाजपकडून चोख प्रत्यु्त्तर देण्यात आले आहे. भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटले की, असुदुद्दीन ओवेसी यांनी सांभाळून बोलायला पाहिजे. त्यांना कधीही कोणीही भाडेकरू म्हटले नाही. मात्र, ते हिस्सेदारीची भाषा करत असतील तर मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमचा हिस्सा तर १९४७ मध्येच देऊन टाकला. त्यामुळे आता हे प्रकरण संपले आहे, असे माधव भंडारी यांनी म्हटले.

असुदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी दिल्लीतील एका सभेत आम्ही कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा मुस्लिमांच्या हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील.

भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले होते.

मागे

पेरणी करत असाल तर बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी
पेरणी करत असाल तर बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी

बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी. जर तुम्ही सध्या पेरणी करत असाल किंवा पे....

अधिक वाचा

पुढे  

हवाईदलाचं AN-32 विमान बेपत्ता, शोधकार्य सुरू
हवाईदलाचं AN-32 विमान बेपत्ता, शोधकार्य सुरू

हवाईदलाचं AN-32 विमान बेपत्ता झाले आहे. यामध्ये विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्र....

Read more