ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी उचललं मोठं पाऊल,1 मेपासून नियम बदलणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी उचललं मोठं पाऊल,1 मेपासून  नियम बदलणार

शहर : देश

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी एका मोठं पाऊल उचललं आहे. जर ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. 1 मेपासून हा नवा नियम लागू होणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु यासाठी एक अटही घालण्यात आली आहे. अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.येत्या 1 मेपासून रेल्वे तिकिटासंदर्भातील नियम बदलणार आहेत. 1 मेपासून ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी आपल्याला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. प्रवासादरम्यान बोर्डिंग स्टेशन बदललं आणि त्यानंतर ते तिकीट रद्द केल्यास त्यावर आपल्याला रिफंड मिळणार नाही. सध्या अशा प्रकारे आरक्षित तिकिटाचं बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही. परंतु 1 मेनंतर हे शक्य होणार आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांवरून 4 तासांवर आणला आहे. 1 मेपासून ट्रेन सुरू होण्याच्या 4 तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.

परंतु एकदा का बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यास पूर्वीच्या बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडता येणार नाही. तरीही प्रवाशानं बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतरही आधीच्याच बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास केल्यास त्याला दोन्ही स्टेशनांवरच्या तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत. बोर्डिंग स्टेशनमध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. परंतु आय-तिकिटावर आपल्याला ऑनलाइन बोर्डिंग पॉइंट बदलण्याचा पर्याय मिळणार नाही. तात्काळ तिकीट बुक केल्यावरही बोर्डिंग स्टेशन बदलता येणार नाही.

मागे

माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील यांना मातृशोक 
माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील यांना मातृशोक 

माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अ....

अधिक वाचा

पुढे  

तूम्ही सुट्टीत मुंबई फिरायला येताय ? तर माहिती करून घ्या, टुरिस्ट तिकीटा बद्दल...
तूम्ही सुट्टीत मुंबई फिरायला येताय ? तर माहिती करून घ्या, टुरिस्ट तिकीटा बद्दल...

मुंबईत रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीच डब्ब्यांम....

Read more