ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अपघातात दोन्ही हात गमावले, पण 'अर्जुन'सह अनेक पुरस्कार कमावले, करमाळ्याच्या सुयशच्या जिद्दीची कहाणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 08:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अपघातात दोन्ही हात गमावले, पण 'अर्जुन'सह अनेक पुरस्कार कमावले, करमाळ्याच्या सुयशच्या जिद्दीची कहाणी

शहर : pandharpur

तो बारा वर्षाचा असताना एका लग्नात गेल्यावर विजेचा झटका बसला आणि भाजलेले दोन्ही हात गमवावे लागले. वडील क्रीडाशिक्षक त्यामुळे त्यांना सुयशला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते. मात्र दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना आपले आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले. याची जाणीव छोट्याश्या सुयशला होती. त्याने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगली आणि त्याच्या या अफलातून प्रवासातून त्याला मोठे यश मिळाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी सुयशची निवड झाली आणि वडिलांना स्वप्नपूर्तीची खूप मोठी भेट मिळाली. आता सुयशचे लक्ष आहे टोकियो ऑलिम्पिकचे, यामध्ये पात्र होऊन देशासाठी सुवर्ण मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाला त्याने सुरुवात केली आहे.

जाधव कुटुंब शेतावरील झोपडीत निवांत

करमाळा तालुक्यातील भाळवणी एक छोटेसे गाव. याच गावातील अपघातात दोन्ही हात गमवाव्या लागलेल्या सुयश जाधवची ही कहाणी. वडिलांच्या इच्छाशक्तीमुळे फोगट भगिनींनी कुस्तीत इतिहास रचला तशीच कहाणी या सुयश जाधवची आहे. कोरोनामुळे सध्या शेतात राबणाऱ्या सुयश जाधवला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आणि सोलापूरच्या इतिहासात पहिल्या अर्जुन पुरस्काराची नोंद झाली ती सुयशच्या रूपाने. पण गावात नाही तर तालुक्यातही अजून कोणाला याबाबत माहितीच नसल्याने जाधव कुटुंब शेतावरील झोपडीत निवांत असलेले पाहायला मिळाले.

वडील नारायण जाधव उत्कृष्ट जलतरणपटू

सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले. त्यांनी राज्यात व देशात अनेक पुरस्कार मिळविले. मात्र परिस्थितीमुळे त्यांना यात करिअर करता आले नाही आणि ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. यावेळी त्यांचा लाडका मुलगा सुयशलाही चांगला जलतरणपटू बनवून त्याला देश विदेशात खेळण्यासाठी सारे सोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न त्यांनी पहिले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते आणि 2004 साली विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात कापावे लागले. आता पोहणे सोडा पण त्याने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना एकदा हात गमावल्यावर त्याला सफाईदारपणे पोहताना वडिलांनी पहिले आणि त्याचेवर मेहनत घेण्यास सुरुवात केली.

आजवर 111 पदकांची कमाई

राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके मिळवत गेला. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केली आहे. 2016 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिला होता. हू त्याची सर्व कामगिरी पाहून भारत सरकारने सुयशाला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करीत त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.

सुयश सध्या आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत

सध्या कोरोनामुळे पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत राहतोय. सकाळी उठल्यापासून शेतात वडिलांसोबत काम करणे आणि नियमित व्यायाम या दोनच गोष्टी त्याला सध्या करता येत आहेत. याचठिकाणी त्याला अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमीही समजली आणि कुटुंब या आनंदात हरवून गेले. वडिलांनी पेढा भरवीत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला तर सुयशने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत त्यांच्या जिद्दीला वंदन केले. पाण्यासोबत गट्टी जमलेला सुयश गेल्या 5 महिन्यापासून टॅंक व जिम बंद असल्याने पोहण्यापासून दूर गेला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण मिळवून देण्याचे स्वप्न

यातच त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण मिळवायचे स्वप्न खुणावू लागले आहे. अशावेळी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने 6 स्वीमरना दुबईत जाऊन ट्रेनिंगची सोय केली आहे. त्याच पद्धतीने 3 पॅरा स्वीमरसाठीही दुबईमध्ये सोया करण्याची मागणी सुयशने केली आहे. यामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाची सर्वोत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा सुयश व्यक्त करतोय. सोलापूर जिल्ह्यात जाहीर झालेला हा पहिलाच अर्जुन पुरस्कार असून 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयशला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्यात कोणत्या प्रतिभा आहेत. त्याला वाव दिल्यास जीवनात हमखास यश मिळते, असा संदेश सुयश आपल्या इतर अपंग बांधवाना देऊ इच्छितो.

मागे

राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबत नवी नियमावली जाहीर
राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबत नवी नियमावली जाहीर

महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. क....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य
मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे....

Read more