ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जळगाव जिल्हाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जळगाव जिल्हाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

शहर : delhi

 

 बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास महिला व बालविकास राज्यमंत्री देवोश्री चौधरीसचिव श्री. रविंद्र पनवरअपर सचिव के. मोझेस चलाई तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याचा सन्मान

बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानात जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगीरी केली आहे. या जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण 841 वरून 925 पर्यंत पोहचले आहे. यापूर्वीही या जिल्ह्यास या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी ही बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल जळगाव जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी उपस्थित होते.

देशातील 5 राज्ये सन्मानित

बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीमती इराणी यांच्या हस्ते हरियाणाउत्तराखंडदिल्लीराजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलातर पूर्व कामेन्ग-अरुणाचल प्रदेशमहेंद्रगढ- हरियाणाउधमसिंह नगर- उत्तराखंडनामाक्कल-तामिलनाडूभिवानी- हरियाणाजळगाव- महाराष्ट्रइटावा- उत्तर प्रदेशरायगड़- छत्तीसगढरेवा- मध्यप्रदेश व राजस्थान येथील जोधपूर या 10 जिल्ह्याचा ही बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच तिरुवल्लुर -तामिलनाडू  अहमदाबाद- गुजरातमंडी- हिमाचल प्रदेशजम्मू व काश्मीर- किश्तवारकर्नाटक- गडाकहिमाचल प्रदेश- शिमलानागालँड-ओखाउत्तर प्रदेश-फरुक्काबादहिमाचल प्रदेश- सिरमौर  व नागौर राजस्थान या 10 अतिरिक्त 

मागे

साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन
साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

यांचे काल रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसा....

अधिक वाचा

पुढे  

पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे
पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे

 अलिकडच्या काळात देश व जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शैक्षणिक, औद्....

Read more