ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पत्रकार पांडुरंग पवार यांच अपघाती निधन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 11:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पत्रकार पांडुरंग पवार यांच अपघाती निधन

शहर : सातारा

सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात सातार्‍यातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू व  पत्रकार पांडुरंग नामेदव पवार (वय 43, मूळ रा. धावडशी, ता. सातारा, सध्या रा. गुरुवार पेठ, सातारा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या दुर्घटनेत त्यांचे सहकारी गंभीर जखमी आहेत. पांडुरंग पवार यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  राजेंद्र दशरथ गायकवाड (50) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून याबाबतची फिर्याद सतीश महादेव सूर्यवंशी (47) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात  दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी रात्री राजेंद्र गायकवाड व पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे दुचाकीवरून नागेवाडी येथून सातार्‍यात परत येत होते. राजेंद्र गायकवाड हे स्वत: दुचाकी चालवत होते तर पांडुरंग पवार हे दुचाकीच्या पाठीमागे बसले होते. रात्री 11 वाजून 45 मि.च्या सुमारास   दुचाकी येथील पुरुष भिक्षेकरी गृहासमोर आल्यानंतर वॅगनर कारची दुचाकीला धडक बसली. याचदरम्यान कारच्या पाठीमागे असणार्‍या इर्टिर्गा कारची वॅगनर कारला धडक बसली. या भीषण अपघातामुळे दुचाकीवरील पांडुरंग पवार व राजेंद्र गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याचदरम्यान त्या परिसरातून रुग्णवाहिका निघाली होती. अपघात पाहिल्यानंतर रुग्णवाहिकेवरील डॉ.दिपाली पाटील व चालक तानाजी पाटील (रा.मलकापूर, कराड) यांनी जखमींना रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग पवार यांना पुढील उपचारासाठी तत्काळ डॉ. अनिल पाटील यांच्या यशवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पत्रकार पांडुरंग पवार यांचा अपघात झाल्याचे समजताच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जीवनधर चव्हाण, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू भोसले, प्रवीण पाटील, भालचंद्र निकम, संदीप शिंदे, दीपक दीक्षित, ओंकार कदम, विठ्ठल हेंद्रे, सचिन जाधव, आशिष निकम व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पवार यांच्यावर उपचार सुरू असतानाच  सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मागे

आर्थिक चणचण असल्यानं विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या
आर्थिक चणचण असल्यानं विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या

मुंबईतल्या विरारमध्ये मायलेकानं आत्महत्या केली. आर्थिक चणचण असल्यानं आत्....

अधिक वाचा

पुढे  

नवर्‍याने शेंडी ठेवल्याने पत्नीने मागितला घटस्फोट
नवर्‍याने शेंडी ठेवल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

भोपाळमध्ये एक अजबगजब प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. नवर्‍याने डोक्या....

Read more