ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वयंपाकघरापासून बँक खात्यापर्यंत होणार 'हे' महत्त्वाचे बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वयंपाकघरापासून बँक खात्यापर्यंत होणार 'हे' महत्त्वाचे बदल

शहर : देश

जुलै महिना सुरु होत असतानाच देसभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत.

एटीएम व्यवहारांवर सवलत मिळणार नाही

बुधवारपासून कोणत्याही बँक खातेधारकाला एटीएम कार्डनं व्यवहार केल्यास कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही आहे. यापूर्वीप्रमाणंच दर महिन्याला मेट्रो शहरांमध्ये आठ आणि ऩॉन मेट्रो शहरांमध्ये कार्डनं दहा वेळाच व्यवहार करता येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी एटीएममधून असिमीत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती.

खात्यात मिनिमम बँलेंसची अट

खातेधारकांना अमुक एका बँकेकडून आखून दिलेल्या नियमांनुसार किमान रक्कम ठेवावी लागणार आहे. लॉकडाऊनदरम्यान किमान रकमेची अट शिथिल करण्यात आली होती. पण, आता मात्र हा नियम पूर्ववत करण्यात येणार आहे.

कमी व्याजदर

बँकखात्याच्या बाबतीत होणारा सर्वात मोठा बदल असणार आहे तो म्हणजे व्याजदर. पंजाब नॅशनल बँकमधील खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

खातं फ्रीज होण्याची शक्यता

अनेक बँकांमध्ये आवश्यक ती कागदपत्र जमा न केल्यास खातेधारकांची खाती बँकेक़डून फ्रिज करण्यात येणार आहेत. बँक ऑफ बडोदा, विजया बँक, देना बँकेत हे नियम लागू करण्यात आले आहेत.

एलपीजीच्या दरांत बदल

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी आणि हवाई इंधनाच्या नव्या दरांची घोषणा करतं. गेल्या काही महिन्यांपासून या दरांचा चढता आलेख पाहायला मिळाला आहे. त्याच धर्तीवर आता एलपीजीच्या दरांतही महत्त्वाचे बदल होणं अपेक्षित आहे.

कोरोना काळात पीएफचे पैसे काढण्याची अखेरची तारीख

 कोरोना काळात केंद्र सरकारकडून पीएफचे पैसे काढण्यासाठीच्या काही नियमांमध्ये शिथिलता दिली होती. पण, या सुविधा फक्त ३० जूनपर्यंतच लागू होत्या. त्यामुळं जुलै महिन्यापासून ही सुविधा उललब्ध नसणार आहे.

 

मागे

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं
बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाध....

अधिक वाचा

पुढे  

'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित क....

Read more