ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शबरीमला मंदिर प्रकरण :४ आठवड्यात कायदा बनवून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी- सर्वोच्च न्यायालय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शबरीमला मंदिर प्रकरण :४ आठवड्यात कायदा बनवून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी- सर्वोच्च न्यायालय

शहर : देश

शबरीमला अयप्पा मंदिर प्रकरणी आठवड्यात कायदा बनवून प्रशासन आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये केरळ सरकारला शबरीमला मंदिराप्रकरणी नवा कायदा आणण्यास सांगण्यात आले होते. पण राज्य सरकारने त्रावनकोर-कोचीन रिलीजियस इंस्टिट्यूशन एक्टचा ड्राफ्ट सादर केला. सरकारतर्फे शबरीमला आणि बाकी मंदिरांसाठी संयुक्त कायदा आणू इच्छित होते. पण सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली.

शबरीमला मंदिरासाठी वेगळा कायदा हवा. न्यायालयाने सरकारला कायदा आणण्यासाठी जानेवारी २०२० पर्यंत वेळ दिला आहे. आमच्या आदेशाचे पालन व्हावे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना शबरीमला प्रकरणात 'आपल्या आदेशाची अवहेलना केली जाऊ नये' असं बजावले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं ही तुमची जबाबदारी असल्याचंही त्यांनी मेहता यांना आठवण करून दिली.

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं शबरीमला मंदिर आणि इतर धार्मिक ठिकाणांवर महिलांच्या प्रवेशासंबंधी याचिका सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे धाडली. या दरम्यान मंदिरात महिलांच्या प्रवेशासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा याआधीचा निर्वाळा कायम आहे.

 

 

मागे

PMC Bank प्रकरण : खातेधारकांना मोठा दिलासा…
PMC Bank प्रकरण : खातेधारकांना मोठा दिलासा…

पीएमसी बँक प्रकरणाचा मुद्दा संसदेत हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. ख....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प
रत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प

जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याल....

Read more