ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केरळ विमान अपघात : प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात किती भयंकर होता, १८ जणांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

केरळ विमान अपघात : प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात किती भयंकर होता, १८ जणांचा मृत्यू

शहर : देश

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला. रक्ताने भिजलेले कपडे, घाबरुन गेलेल्या रडणाऱ्या बाळांचा आवाज आणि रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने परिसराने हादरवून सोडले. शुक्रवारी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या  (Kozhikode) हवाई पट्टीतून खाली कोसळले आणि दरीत पडले. या विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८  जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यासह बचावकर्त्यांनी पावसाच्या दरम्यान जखमी प्रवाशांना विमानामधून बाहेर काढले. मोठा आवाज होत या विमानाचे दोन मोठे तुकडे झाले आणि एका क्षणात काय घडले हे प्रवाशांना समजू शकले नाही. एकदम ओरडण्याचा आवाज ऐकू आला. या अपघातात  को-पायलटअखिलेश कुमार आणि दीपक वसंत साठे या पायलटचा मृत्यू झाला.

दरम्यान, मदत आणि बचावकर्त्यांना चार ते पाच वर्षांची मुले आपल्या आई-वडिलांच्या मांडीवर चिकटून बसताना दिसली आणि प्रवाशांचे सर्व सामान येथे विखुरलेले होते. हे दृश्य मनहेलावून टाकणारे होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.

एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, तो मोठा आवाज ऐकून विमानतळाच्या दिशेने पळाला. लहान मुले सीट खाली अडकली, बरेच लोक जखमी झाले आणि ते खूप वाईट होते. अंगावर काटा आणणारा तो प्रसंग होता. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बर्याच लोकांचे पाय तुटले होते, माझे हात आणि कपडे जखमींच्या रक्ताने डागालले होते. मोठा आवाज ऐकताच स्थानिक लोक मदतीसाठी धावले.

बचाव कार्यात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, "जखमी पायलटला कॉकपिट तोडून विमानाबाहेर काढण्यात आले." अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली तेव्हा लोकांनी कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मोटारीने प्रवाशांची वाहतूक सुरु केली.

 

मागे

केरळ विमान दुर्घटना: विमानाला वाचवण्याचा वैमानिकांनी शेवटपर्यंत केला प्रयत्न
केरळ विमान दुर्घटना: विमानाला वाचवण्याचा वैमानिकांनी शेवटपर्यंत केला प्रयत्न

शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर दुबईहून ये....

अधिक वाचा

पुढे  

कोझीकोड विमान अपघातात मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू
कोझीकोड विमान अपघातात मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू

केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन द....

Read more