ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जाणून घ्या गुढीपाडवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त केव्हा आहे?

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जाणून घ्या गुढीपाडवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त केव्हा आहे?

शहर : मुंबई

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
 

मागे

पंतप्रधान मोदींना ‘झाएद पदका’ने सन्मात करणार
पंतप्रधान मोदींना ‘झाएद पदका’ने सन्मात करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘झाएद पदका’ने सन्मान करण्यात येणार आहे. अबूध....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर ठाम ,भारतीय वायूदलाने अमेरिकेचा दावा फेटाळला
पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर ठाम ,भारतीय वायूदलाने अमेरिकेचा दावा फेटाळला

काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमा....

Read more