ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आशिष शेलार यांनी या घटनेनंतर ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मतदार संघातील खा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 10:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आशिष शेलार यांनी या घटनेनंतर ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मतदार संघातील खा

शहर : मुंबई

ऐन पावसाळ्यात मुंबईतील इमारती कोसळ्याची आणखी एक घटना घडली. वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं (Bandra Building Collapse incident ).यात 16 नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी आहेत. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरुच आहे.

कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याचा ढिगारा उपसण्यासाठी सध्या 5 जेसीबी, 5 डंपर मागवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले. त्यापैकी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला रात्रीच यश आले. जखमींवर लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

के. एच. वार्डाचे वरिष्ट अभियंता वाघमारे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. पावसाळ्यात इमारत कोसळण्याची मुंबईतील ही दुसरी मोठी घटना आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

आशिष शेलार यांनी या घटनेनंतर ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी.”

मागे

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण; 'शिक्षण मंत्रालय' ही असेल नवी ओळख
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण; 'शिक्षण मंत्रालय' ही असेल नवी ओळख

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची नवी ओळख यापुढं देशासमोर येणार आहे. राष....

अधिक वाचा

पुढे  

Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास 'नो एन्ट्री', मुंबई पालिकेकडून नियमावली ज
Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास 'नो एन्ट्री', मुंबई पालिकेकडून नियमावली ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आ....

Read more