ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पिंपरीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पिंपरीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण

शहर : पुणे

पुण्यातील आयटी पार्क शेजारी असणार्‍या कासारसाई इथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे देखील मिळाल्याच पाहायला मिळालं. ही घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड मधील सांगवी परिसरातील सीक्युएईमध्ये बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात रहिवासी आणि कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे. तसा दुजोरा सांगवी पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यापासून बिबट्याची वाट शहराकडे वळताना दिसत आहे. आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या कासारसाई परिसरात बिबट्या दिसला होता. त्याच्या पायाचे ठसे देखील सापडल्याचे स्थानिक सांगतात. ही घटना ताजी असताना पुण्याचे मध्यवरती ठिकाण असलेल्या सांगवी सीक्युएईमध्ये सोमवारी बिबट्या दिसल्याच सांगण्यात येत असून त्या संदर्भात पत्र काढण्यात आल आहे. सीक्युएईमध्ये लष्कर आणि संरक्षण विभागासाठी उपकरणे आणि रसायने बनवली जातात. सोमवारी मुळा नदी जवळ बिबट्या दिसल्याच नागरिकांचं म्हणणं आहे. परिसरात जंगल आणि इमारतीचा मोठा भाग आहे.

मागे

अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी
अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी

अंबरनाथमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन 6 या मोबाइलचा भीषण स्फोट झाल्याची घटना ....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यात शनिवार पेठेतील मेडिकल दुकानाला आग
पुण्यात शनिवार पेठेतील मेडिकल दुकानाला आग

शनिवार पेठेतील प्रभात टॉकीज समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सकाळी  आ....

Read more