ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत 40 प्रवासी जखमी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत 40 प्रवासी जखमी

शहर : bhubaneswar

      भुवनेश्वर - कटकमधील नरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे कळते. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


       या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस भुवनेश्वरला जात होती. आज सकाळी सलगाव आणि नरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ ही गाडी येताच त्या भागात डाट धुके होते. या धुक्यामुळे रेल्वे चालकाला पुढे काही दिसले नव्हते. त्यामुळे एक्स्प्रेसने त्या मार्गावरील एका मालगाडीला धडक दिली. त्यात ही गाडी रुळावरून घसरली आणि दुर्घटना घडली. 

 


         या दुर्घटनेत ४० प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेताच बचावकार्य सुरू केलं. रेल्वेचे ६ डबे रुळावरून घसरले आहेत. शिवाय घनदाट जंगल आणि दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे समजते.    

मागे

मुंबई गारठली; पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली 
मुंबई गारठली; पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली 

     मुंबई - नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच राज्यात थंडीला सुरुवात झाली....

अधिक वाचा

पुढे  

‘एयर आशिया’ सीईओ टोनी फर्नांडिसला 'ईडी’ची नोटीस  
‘एयर आशिया’ सीईओ टोनी फर्नांडिसला 'ईडी’ची नोटीस  

         नवी दिल्ली - भारतासह दक्षिण-पूर्ण आशियातील प्रमुख विमान कंपनी &l....

Read more