ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सणसवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 जण जखमी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 08:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सणसवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 जण जखमी

शहर : purna

रांजणगाव येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत होत्याचे नव्हते झाले. तालुक्यातील सणसवाडीतल्या चेअरमनवस्तीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग भडकली. वस्तीतील 4 कौलारू घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आणि बेचिराख झाली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. स्थानिक युवकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रांजणगाव येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत होत्याचे नव्हते झाले.
चेअरमनवस्तीत दाटवाटी असल्याने आग विझविण्यास मोठी कसरत करावी लागली. स्थनिक नागरिकांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. स्फोटाने उडालेल्या कौलांमुळे बाजूच्या 4 मुलांना दुखापत झाली आहे. चेअरमनवस्तीत तात्याभाऊ, दत्तात्रय, मॅचिंद्र व किसन जयवंत दरेकर यांचे जुन्या धर्तीचे कौलारू 20 खन घर आहे. मुले, नातवंडे असा परिवार या घरात राहत आहे. त्यातील पूर्वच्या बाजूच्या खोलीत विजय तात्याबा दरेकर पत्नी व 3 मुलांसह राहत असून आज सकाळी तळेगाव येथील एजन्सीतून आणलेला सिलिंडर लावत असतानाच भडका होऊन स्फोट झाला. घराची कौले दूर पर्यंत उडाली. भीषण आग लागली. आजूबाजूचे युवक धावले व वायरमानला फोन करून लाईट कनेक्शन बंद केले. तोवर शेजारच्या घरांना आगीची धग पोहोचून त्यातील सिलिंडरचाही मोठा स्फोट झाला व आग भडकून शेजारील 4 घरे भस्मसात झाली.

मागे

भाजपाच्या वादग्रस्त उमेदवार स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तास बंदी 
भाजपाच्या वादग्रस्त उमेदवार स्वाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारावर 72 तास बंदी 

भोपाळच्या भाजपा उमेदवार वादग्रस्त प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक आयोगाने चप....

अधिक वाचा

पुढे  

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आपल्या मित्राबरोबर निर्जन स्थळावर बोलत बसलेल्या मुलीच्या मित्राला झाडावर....

Read more