ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 09:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश

शहर : मुंबई

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ५२ वर कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्याचवेळी पाच रुग्ण बरेही झालेत. मात्र,  कोरोनाचा फैलाव झालेल्या महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. असे असले तरी रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संदेश देताना हा निर्णय जाहीर केला. महामुंबईमध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरंही बंद राहणार आहेत. महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून होणार आहे.

राज्यातल्या रेशन दुकानांना तीन महिन्यांचे पुरेल इतके धान्य, कांदे, बटाटे देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही सवलती स्थानिक प्रशासनालादेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे खर्च होऊन शकलेला निधी वाया जाणार नाही यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, राज्यातल्या जनतेने लग्न, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी करू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठीकरण्यात आलेल्या उपाययोजना बाबत भावनिक मुद्दे आणून अडथळे निर्माण करू नये, असेही आवाहनही त्यांनी केले.

 

मागे

निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे
निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई
महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात य....

Read more