ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 29, 2021 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

शहर : मुंबई

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केले आहे.

लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालील सूचनांचं पालन करणं आश्यक आहे.

1.सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

2.सामाजिक अंतर राखणं गरजेचं

3.सतत हात धुणे आवश्यक

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती समोर आली होती. जगभरातील सर्वच देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (MHA) देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना (New Covid Guidelines) जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

 

मागे

दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवरून आरोप-प्रत्यार....

अधिक वाचा

पुढे  

वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, शिक्षण खात्यात नोकरीची सुवर्णसंधी
वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, शिक्षण खात्यात नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शालेय....

Read more