ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

शहर : मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश दिला. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केलीतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

कोणकोणत्या परीक्षा रद्द?

पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द

नववी ते अकरावी  – 15 एप्रिलनंतर परीक्षा

दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील.

पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल

मागे

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील दुकानं, कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील दुकानं, कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार
कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार

कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याच....

Read more