ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 07:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

शहर : मुंबई

कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरिया तापाच्या उपचारासाठी वापरली जाणाऱ्या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) स्थापन केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने कोविड – 19 च्या उपचारासाठी मलेरियावरील औषध हायड्रॉक्सी-क्लोरोक्विनला मंजुरी दिली आहे.

हायड्रॉक्सी-क्लोरोक्विनने कोरोनाचा उपचार

संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. ही माहिती सरकारने पत्रकार परिषदेत दिली. आयसीएमआरचे महासंचालक बलाराम भार्गव म्हणाले की, कोरोना विषाणू संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार करत असलेले आरोग्य कर्मचारी किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या संसर्गाची अति जोखीम असलेल्यांना हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन देण्यात यावे.

मर्यादित प्रमाणात वापर करावा

नॅशनल टास्क फोर्स द्वारे शिफारस करण्यात आलेल्या या ट्रीटमेंट प्रोटोकॉलला जनरल कंट्रोलर ऑफ इंडियानेही मान्यता दिली आहे. मात्र, या औषधाचा उपयोग आपातकालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणातच करता येईल.

हे औषध लहान मुलांसाठी नाही

हे औषध 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जात नाही. शिवाय, ज्या लोकांना डोळ्यासंबंधी कुठला आजार असेल, त्यांनाही हे औषध दिलं जाऊ नये, असं सागितलं आहे.

सल्लामसलतनुसार, हे औषध केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्देशानुसारच द्यावे. तसेच, काही डॉक्टरांच्या मते, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे औषध घेणं धोकादायक ठरु शकतं.

हे औषध घेताना थोडी काळजीही घेणे गरजेचं आहे. हे औषध दिवसाला दोनवेळा 400 मिलीग्राम दिलं जावं. त्यानंतर ते आठवड्याला 400 मिलीग्राम एकदा असं 7 आठवड्यांपर्यंत देण्यात यावं.

टीपकुणीही स्वत:हून हे औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच या औषधाचा वापर करावा

 

मागे

अडकलेल्या कामगारांसाठी जनता किचन, मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था
अडकलेल्या कामगारांसाठी जनता किचन, मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र ....

अधिक वाचा

पुढे  

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आह....

Read more