ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

47 लाख कोटींचा धनकुबेर पण मुलगा भारतीय लष्करात अधिकारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2024 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

47 लाख कोटींचा धनकुबेर पण मुलगा भारतीय लष्करात अधिकारी

शहर : विदेश

इब्राहिम यांच्याजवळ 5.7 दक्षलक्ष डॉलर म्हणजे 47.33 लाख कोटी रुपये संपत्ती आहे. इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माईल भारतीय लष्करात अधिकारी आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्कारात होते.

मुस्लिम राष्ट्र असलेल्या मलेशियाचे नवीन राजे म्हणून इब्राहिम इस्कंदर यांची निवड झाली आहे. त्यांच्याकडे 47 लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांची संपत्ती आणि राजेशाही थाट पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे. त्यांची स्वत:ची खासगी आर्मी आहे. 300 पेक्षा जास्त लग्झरी गाड्या त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे अनेक जेट विमान आहेत. परंतु इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माइल इदरीस हे भारतीय लष्करात अधिकारी आहेत. आता ते कॅप्टन झाले आहे.

17वा राजा म्हणून शपथ

65 वर्षी जोहोर येथील सुलतान इब्राहिम इस्कंदर मलेशियाच्या राजसिंहासनावर बसले आहे. अब्जाधीश म्हणजे धनकुबरे असलेले सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी बुधवारी मलेशियाचा 17वा राजा म्हणून शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी ते त्यांच्या खासगी जेटमध्ये आले होते. 1957 मध्ये मलेशियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु या देशातील नऊ राजघराण्यांचे प्रमुख दर पाच वर्षांनी राजा बनतात. मलेशियामध्ये 13 राज्ये आहेत असून नऊमध्ये राजघराणे आहेत. तसेच पेराक राज्याचा शासक आणि सिंहासनाचे पुढील वारसदार सुलतान नाझरीन यांची उपराजा म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.

मुलगा भारतीय लष्कारात अधिकारी

इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माईल भारतीय लष्करात अधिकारी आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्कारात होते. टुंकू जुलै 2003 मध्ये डेहराडून स्थित IMA मध्ये कॅडेट अधिकारी म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये ते भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. डिसेंबर 2007 मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. त्याचे वडील आणि आजोबा यांनीही आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतले.

इब्राहिम यांच्याकडे किती आहे संपत्ती

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इब्राहिम यांच्याजवळ 5.7 दक्षलक्ष डॉलर म्हणजे 47.33 लाख कोटी रुपये संपत्ती आहे. त्यांनी शाही परिवार पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि कॅबिनेट सदस्यांच्या उपस्थितीत एका समारंभात शपथ घेतली. सुल्तान इब्राहिम यांच्याकडे रिअल इस्टेटपासून दूरसंचार आणि वीज उपकरण बनवण्याचे उद्योग आहे.

मागे

मध्यरात्री ज्ञानवापीचे तळघर उघडले, 31 वर्षानंतर पूजा, गणेश-लक्ष्मीची आरती
मध्यरात्री ज्ञानवापीचे तळघर उघडले, 31 वर्षानंतर पूजा, गणेश-लक्ष्मीची आरती

न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री पूजा करण्यात आ....

अधिक वाचा

पुढे  

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार
भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशा....

Read more