ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वाराणसीमध्ये आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वाराणसीमध्ये आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

शहर : varanasi

वाराणसीतल्या लक्सा भागात राहणारा दीपक कुमार कपडे विकण्याचं काम करायचा. त्याच्या कुटुंबात पत्नीसह निबिया (9), अद्वितीय (7) आणि रिया (5) असे चार सदस्य होते. दीपक आयपीएलच्या सामन्यांवरील सट्ट्यात सतत पैसे हरत होता. त्याची पत्नी माहेरी गेल्यानं तिला याबद्दलची कल्पना नव्हती. काकांनी त्यांच्या तीन मुलींना काहीतरी खायला दिल्याचं दीपक कुमार यांच्या पुतणीनं सांगितलं. ’काकांच्या तीन मुली अंगणात झोपल्या होत्या. काही वेळानं काका तिथे आले आणि त्यांना आत घेऊन गेले. त्यानंतर ते आजीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागले. काही वेळानं त्यांची छोटी मुलगी रिया आजीजवळ गेली आणि वडिलांनी काहीतरी खायला दिल्याचं सांगू लागली. त्यावेळी काकांनी काहीतरी बहाणा सांगून शौचालयात गेले आणि त्यानंतर तिन्ही मुलींना उलट्या सुरू झाल्या,’ असं दीपक यांची पुतणी साक्षीनं सांगितलं. 
तीन मुलींसोबतच दीपक यांना देखील उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना कबीरचौरा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला. दीपक आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज भांडणं व्हायची. त्यामुळे देखील तो तणावाखाली होता, असं शेजारच्यांनी सांगितलं. आयपीएलवरील सट्ट्यात सतत हरल्यानं दीपक कर्जबाजारी झाला होता. दीपकनं मुलांच्या जेवणात विष कालवलं आणि स्वत:ही विष घेतलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 

मागे

कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग
कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये कामाख्या एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

...तर मी पुस्तक वाचले नाही, मी आत्ताच बोलणार नाही-शरद पवार
...तर मी पुस्तक वाचले नाही, मी आत्ताच बोलणार नाही-शरद पवार

नारायण राणेंच्या पुस्तकाने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. नारायण राणे यांन....

Read more