ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरक्षणाच्या लढाईचे नवे पर्व, 'मराठा आंदोलन 2020' ची घोषणा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरक्षणाच्या लढाईचे नवे पर्व, 'मराठा आंदोलन 2020' ची घोषणा

शहर : अहमदनगर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता नव्या आंदोलनाची घोषणा केलीय. मराठा आंदोलन २०२० या नावाने हे नवे पर्व असणार आहे, अशी माहिती मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. tमराठा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिक्षण, पीएच.डी यामध्ये आरक्षण कसे मिळेल, याबाबचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी यापूर्वी मूक मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा अशी आंदोलन केली आहेत. आता आरक्षणाच्या लढाईचे तिसरे पर्व सुरू होणार, असून ही आरपारची लढाई असेल, असे आबासाहेब पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी बातचित करताना सांगितले.जर सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आता आमची लढाई सुरू करावी लागेल, असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलन 2020 कशा प्रकारे करण्यात येईल, त्याची काय रणनिती असेल हे सध्या माध्यमातून जाहीर करणार नाही, असेही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या लढाई संदर्भातील प्रत्येक गोष्ट माध्यमातून जाहीर करणार नाही. मात्र, वेळ आल्यावर कळेलच अशी भूमिका पाटील यांननी व्यक्त केली. सरकारने आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका घ्यावी. आता आरक्षणासाठी आरपारची लढाई असेल, सरकारने निर्णय घेतले नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

 

मागे

सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा मनसेचा आरोप
सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा मनसेचा आरोप

सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे....

अधिक वाचा

पुढे  

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर
मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

मनसेने सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी केलेल्या सविनय का....

Read more