ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर

शहर : मुंबई

सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. मराठा समाजाच्या राज्यातील अनेक संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी यांची या परिषदेचा उपस्थिती पाहायला मिळाली. या परिषदेत मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असे जवळपास १५ ठराव मंजूर करण्यात आले.

मराठा समाज गोलमेज परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे -

मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

- मराठा समाजातील मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.

- केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.

- महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.

- सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.

- राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.

- मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.

- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.

- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.

- स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.

- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.

- राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

- कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी

- राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी

मागे

Corona Vaccine : कोरोनाविरोधी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीला KEM रुग्णालयात सुरुवात
Corona Vaccine : कोरोनाविरोधी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीला KEM रुग्णालयात सुरुवात

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोरोना विरोधातील लशीच....

अधिक वाचा

पुढे  

आठच्या हजेरीसाठी पहाटे चारपासून बससाठी रांगा, वसई-विरारच्या नोकरदारांचे हाल सुरुच
आठच्या हजेरीसाठी पहाटे चारपासून बससाठी रांगा, वसई-विरारच्या नोकरदारांचे हाल सुरुच

लोकल सेवेअभावी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील चाकरमान्यांचे हाल सुरु आहे....

Read more