ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत,कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत यायचं का?संदीप देशपांडें

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 10:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत,कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत यायचं का?संदीप देशपांडें

शहर : मुंबई

राज्यात लवकरच अनलॉक 5 ची घोषणा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहे. राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

अनलॉक 5 सुरू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?” असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोरोनाच्या संकट काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचं समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हॉटेल सुरु केल्यावर मी पुन्हा पाहायला येणार नाही

हॉटेल सुरु केल्यानंतर ते पुन्हा बंद करावे लागणार नाही याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल. हॉटेल मालकच माझे कॅमेरा आहेत. त्यांनीच मला सांगायला पाहिजं की आम्हाला कोरोना नियंत्रण करायचं आहे. थोडे दिवस थांबा. तुम्ही परवानगी द्या. एकदा का हॉटेल सुरु केलं, तर जबाबदारीने चालवले पाहिजे. हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि हॉटेल कसे चालवणार याची विशेष पद्धत (SOP) सरकारला द्यावी. आणखी काही सूचना असतील तर जरुर करा. पण एकदा हॉटेल सुरू केल्यानंतर मी तुमच्याकडे बघायला येणार नाही. तुम्ही माझे परिवार-सहकारी म्हणून काम केलं पाहिजे. मी कुणावर पाळत ठेवणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मागे

NCB चीफ दिल्लीला परतले, आता कुणाचीही चौकशी नाही, पुराव्यांचे करणार पुनरावलोकन
NCB चीफ दिल्लीला परतले, आता कुणाचीही चौकशी नाही, पुराव्यांचे करणार पुनरावलोकन

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्स संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहित....

अधिक वाचा

पुढे  

विमा कंपनी मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करू शकत नाही !
विमा कंपनी मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करू शकत नाही !

तुमचा आरोग्य विमा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरोग्य विम्या ....

Read more