ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 06, 2021 08:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार

शहर : मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका इथे तोडफोड केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरे  हे वाशी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे हे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते. आज सकाळी १० ते १०.३० दरम्यान राज ठाकरे वाशी टोल नाका इथे पोहचणार आहेत. त्यानंतर ११ पर्यंत राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहणार आहेत.

 

मागे

ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट
ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट

मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) च्या विशेष कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, आयसीआय....

अधिक वाचा

पुढे  

रिझर्व्ह बँकेत आता सर्वसामान्यांना खाते उघडता येणार
रिझर्व्ह बँकेत आता सर्वसामान्यांना खाते उघडता येणार

येत्या काही दिवसातच देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजे रिझर्व्ह बँकेत Reserve Ba....

Read more