ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? मनसेचा सवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? मनसेचा सवाल

शहर : मुंबई

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

अनिल परब हे 100 टक्के एसटी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मात्र ते एसटीच्या सगळ्या प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? लोकांनी सहा महिने कोमट पाणी प्यायले तरीही कोरोना झाला, ती जबाबदारी कुणाची होती? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेनी जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे, हे लक्षात असू द्या,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसेने मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी केली होती. मात्रलोकल सुरु केल्यानंतर सगळी जबाबदारी मनसे घेणार का?”असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता मनसेनेही एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे अनिल परब यांनी सांगितलं होतं.

 

मागे

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३,३३७ नवे रुग्ण; १२४७ जणांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३,३३७ नवे रुग्ण; १२४७ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढ....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai Bed Availability | मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त
Mumbai Bed Availability | मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी जवळपास 50 टक्के ख....

Read more