ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी

शहर : मुंबई

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक गैरव्यवहारामुळे आणखी एकाचा नाहक मृत्यू झाला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. पीएमसी बँकेतील ही १७ लाख खाती नाहीत तर ही १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारती सदरांगानी असं बळी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. भारती यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

73 वर्षांच्या भारती या पीएमसी बँक खातेधारक चंदन चोत्रांनी यांच्या सासू आहेतमुलीचे बँकेत कोटी २५ लाख रूपये अडकल्याने त्यांना धक्का बसला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. भारती सदरांगानी या सोलापूरच्या राहणाऱ्या आहेत. रविवारी दुपारी 2 वाजता त्यांचे निधन झाले. चंदन यांचे मुंबईतील मुलुंड पीएमसी शाखेमध्ये खाते आहे.

आतापर्यंत जणांचा पीएमसी बँक गैरव्यवहाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मुरलीधर धारा हे पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचे तिसरे बळी ठरले आहेत. याअगोदर फटतो पंजाबी आणि संजय गुलाटी या दोन खातेधारकांचा तणावामुळे मृत्यू झाला होता.

आज आझाद मैदानावर आंदोलन

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक ठेवीदार, खातेदारांनी आंदोलन कारण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन उद्या २२ रोजी सकाळी १०.३० ते या वेळत मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई विभागातील २१ गुरूद्वार एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने बॅंक खातेदार मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिख समुदायाने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला असून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यालयातमध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मागे

पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान
पित्याच्या अस्थी घेऊन 7 मुलांनी केले मतदान

संध्याकाळी साडेपाच पर्यन्त महाराष्ट्रात ५३.४६ टक्के मात्द्न झाल्याचे दिस....

अधिक वाचा

पुढे  

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप
सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप

रवीवार, सोमवार त्यानंतर मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्ष....

Read more