ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सासूच्या पार्थिवाला चार सुनानी दिला खांदा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सासूच्या पार्थिवाला चार सुनानी दिला खांदा

शहर : बीड

बीड मध्ये काल प्रेमळ सासूच्या पार्थिवाला चार सुनानी खांदा दिल्याचे अनोखे दृश एका अंत्ययात्रेत पाहायला मिळाले. एरवी सासू सुनांचे नाते म्हणजे विळ्या भोपळ्याचे नाते असल्याचेच पाहावयास मिळते. त्यामुळे सासू सुनेचा वाद काही नवा नाही क्षुल्लक कारणावरून सासुला सुनेने बाहेर काढल्याचे किंवा सासूने सुनेचा छळ केल्याची घटना नेहमी एकावयास मिळतात.

तथापि, बीडमधील 80 वर्षाच्या सासूबाई सुंदरबाई नाईकवडे यांचे वृद्धापकाळाने काल निधन झाले. त्यांनी आपल्या सुनांवर आयुष्यभर मुलींप्रमाणे प्रेम केले. सुनाना माहेरची आठवण होऊ दिली नाही. त्यामुळे सुंदराबाईंच्या निधनाने त्यांच्या चारही सुना लता , उषा, मनीषा आणि मिना यांना अतिशय दु:ख झाले. मुली आणि सुना असा भेदभाव कधीच न करणार्‍या आपल्या प्रेमळ सासूच्या पार्थिवाला जड अंतकरणाने खांदा देत चारही सुना अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. सुंदराबाईच्या पश्चयात चार पुत्र सुना आणि दोन कन्या असा परिवार आहे.

 

मागे

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र  सोलापूर विद्यापीठात स्थापणार
महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सोलापूर विद्यापीठात स्थापणार

महात्मा बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान अभ्यासण्यासह त्याच्या सध्याच्या काळा....

अधिक वाचा

पुढे  

एसटी सवलतींचा 2 कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ
एसटी सवलतींचा 2 कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ

गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनां....

Read more