ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

शहर : मुंबई

दरवर्षी पावसाळयात  इमारत कोसळणे, इमारतीचा स्लॅब पडणे, सरक्षक भिंती कोसळणे, दरडी  कोसळून त्याखाली झोपड्या गाडल्या जाणे, रस्ते खचणे, पूल वाहून जाणे धरण फुटणे आदि दुर्घटना घडत असतात म्हणूनच जर्जर झालेल्या इमारती किंवा डोंगर उतारवरील धोकादायक झोपड्यातील रहिवाश्यांना पावसाळयापूर्वी अशा इमारती व झोपड्या खाली करण्याची नोटिस महापालिका व संबंधित यंत्रना बजावत असतात. पण राहती जागा सोडण्यास आपण बेघर होऊ  या भीतीने जिवावर उदार होऊन रहिवासी तेथेच राहत आहेत. या पार्श्भूमीवर मुंबई महापालिकेने तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकि 390 इमारतीमधील रहिवाशांना मोठा धोका आहे. तर 68 धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत 499 अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकि एकही  इमारत पूर्णत पाडण्यात आलेली नाही. 54 धोकादायक इमारती रहिवाशांनी कोणतीही हरकत न घेता  रिकाम्या केल्या आहेत. 14 इमारती रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत पण परवानगी दिलेली नाही . 174 धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी महापालिकेच्या करवाईविरोधात न्यायालयात स्थगिती मिळविली आहे. 65 इमारतींचे पाणी आणि वीज महापालिकेने कापली आहे. तरीही लोक तेथे राहत आहेत. 

मागे

रत्नगिरीत रस्ता खचल्याने बस उलटली 
रत्नगिरीत रस्ता खचल्याने बस उलटली 

कोकणात मुसळधार पाऊस कोसल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची चलन झाली आहे. त्याच....

अधिक वाचा

पुढे  

पाण्याची थकबाकी  233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये
पाण्याची थकबाकी 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदार....

Read more