ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर 30 व्या मजल्यावरून उडीमारून जीएसटी अधिकार्‍याची आत्महत्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 02:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर 30 व्या मजल्यावरून उडीमारून जीएसटी अधिकार्‍याची आत्महत्या

शहर : मुंबई

जीएसटी अधिकार्‍यानं कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या 30व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी घडली. हरेंद्र कपाडिया (51) असं अधिकार्‍याचं नाव आहे.  कपाडिया यांनी काल संध्याकाळी साडेसहा वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीच्या 30व्या मजल्यावरून उडी मारली. तेथील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ’कपाडिया यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ब्रेन स्ट्रोकमुळं गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून ते कामावरही गेले नव्हते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. 
आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती कपाडिया यांच्या कुटुंबीयांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

मागे

प्रियंका शर्मांना अखेर जामीन मंजूर; ममता बॅनर्जीची मागावी लागणार माफी
प्रियंका शर्मांना अखेर जामीन मंजूर; ममता बॅनर्जीची मागावी लागणार माफी

ममता बॅनर्जी यांचा विनोदी फोटो बनवून तो फेसबुकवर पोस्ट करणार्‍या प्रियंक....

अधिक वाचा

पुढे  

चक्क! प्रियंका गांधींनी मारली बॅरिगेटवरून उडी
चक्क! प्रियंका गांधींनी मारली बॅरिगेटवरून उडी

उत्तर प्रदेश सचिव प्रियंका गांधी या काल मध्यप्रदेश येथील रतलाम येथे लोकसभा....

Read more