ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो सावधान !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो सावधान !

शहर : मुंबई

लोकलमध्ये दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो काळजी घ्या. कारण तुमच्यावर हल्ला होऊ शकतो. तोही तुमचा मोबाईल चोरण्यासाठी. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवाशांचे मोबाईल लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. मोबाईल चोरी करणारा एक आरोपी बोरीवलीत पकडण्यात आले आहे.

बुरख्यात दिसणाऱ्या आरोपीने धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या अंगावर लोखंडी रॉड फेकून मारला. याप्रकरणी बोरवली रेल्वे स्थानकात चोरीची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. पोलिसांनी सूत्रांच्या माहितीनुसार या आरोपीचा शोध घेऊन सीसीटीव्हीच्या मदतीने दीपक किशन भोडकरला अटक केली आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

पोलिसांनी आरोपीची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे वेगवेगळे मोबाईल सापडलेत. दृश्यामध्ये दिसणारा हा तोच लोखंडी रॉड आहे जो आरोपी लोकलमधील प्रवाशांवर फेकून मारायचा. फटका गँगच्या दहशतीमुळे लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी धास्तावलेत. या प्रकरणातले फिर्यादी शक्ती मोहन पिल्ले यांना जबर दुखापत झाली आहे.

मुंबईकरांनो लोकलमधून प्रवास करताना विशेष काळजी घ्या विशेषतः दरवाजात उभे राहून प्रवास करताना फोनवर बोलू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागे

योगी सरकारचा मोठा निर्णय, 17 जाती आणल्या SC अंतर्गत
योगी सरकारचा मोठा निर्णय, 17 जाती आणल्या SC अंतर्गत

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेत 17 ओबीसी जातींना एससी वर्गात स....

अधिक वाचा

पुढे  

'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक
'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक

'जेट एअरवेज'च्या ७५ टक्के समभागासाठी कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्....

Read more