ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतानाच कोसळले, दोन स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतानाच कोसळले, दोन स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू

शहर : मुंबई

या मॅरेथॉन स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली. मॅरेथॉनमध्ये धावतानाच दोन स्पर्धक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये काल, रविवारी टाटा मॅरेथॉन पार पडली. दरवर्षी प्रमाणे या यावर्षीही मुंबई टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या मॅरेथॉन स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली. 74 वर्षीय राजेंद्र चंदमल बोरा हे मॅरेथॉनमध्ये धावत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर आणखी एक स्पर्धक सुवरदीप (वय 45) हेही मॅरेथॉनमध्ये धावातना खाली कोसळले. त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी आजाद मैदान पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

देश विदेशातील हजारो नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी नोंदवला. माहीम रेती बंदर इथून हॉफ मॅरेथॉनला सुरवात झाली. माहीम-वरळी सीलिंक -हाजी आली करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ही मॅरेथॉन संपली. एकूण 21 किलोमीटरची ही रन होती. त्यासाठी आता हजारो स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. यात सहभागी झालेल्यांनी 10 किलोमीटर अंतर धावत पार केलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे 19 वं वर्षं होतं.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर या स्पर्धेत भाग घेतलेल्या 22 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनचे १९ वे वार्षिक आयोजन मुंबईत रविवारी करण्यात आले होते. यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसटी येथे हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र यातील दोन स्पर्धक, सुवरदीप बॅनर्जी (वय 45) आणि राजेंद्र बोरा (वय 74) यांचा २१ जानेवारी २०२४ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मागे

कारसेवकांवरुन राज्यात कुरघोडीचं राजकारण! पण ‘कार सेवा’ हा शब्द आला तरी कुठून?
कारसेवकांवरुन राज्यात कुरघोडीचं राजकारण! पण ‘कार सेवा’ हा शब्द आला तरी कुठून?

राज्यात सध्या कार सेवा कोणी केली, कार सेवक म्हणून अयोध्येला कोण गेले, यावरुन....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी
मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी

देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याच....

Read more