ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक मेसेज अन् पळापळ… मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलिस हाय अलर्टवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2024 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एक मेसेज अन् पळापळ… मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलिस हाय अलर्टवर

शहर : मुंबई

मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि एकच खळबळ उडाली. हा मेसेज मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज पाठवला. मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही त्याने दिली. या मेसेजनंतर मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आणि मेसेज पाठवणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.

तसेच वाहतूक पोलिसांनी शहर पोलिस आणि गुन्हे शाखा एटीएसलाही माहिती दिली. काही संशयास्पद ठिकाणांचीही झडती घेण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. यानंतर रात्री उशिरा जॉइंट सीपींनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे.

यापूर्वीही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल आणि मेसेजद्वारे धमक्या आल्या आहेत. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य आढळले नव्हते. आता पुन्हा असाच मेसेज आल्याने खळबळ माजली. धमकीचा तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेण्यात येत आहे.

मागे

लोकसंख्या वाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ही आश्चर्यकारक घोषणा
लोकसंख्या वाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ही आश्चर्यकारक घोषणा

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्या बदलाचे मूल्यांकन करण्यास....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प, सर्व सामान्यांना काय मिळणार?
मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प, सर्व सामान्यांना काय मिळणार?

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सादर होणाऱ्या बीएमसीच्या बजेटकडे ....

Read more